बकरी योगा करण्यासाठी लांबलचक रांगा


जगातील सुपरपॉवर अशी ओळख असलेला अमेरिका कधी व कुठल्या फॅडमध्ये वाहात जाईल हे सांगणे अवघड. योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली बहूमूल्य भेट. स्वास्थ रक्षणासाठी योगाचा होत असलेला उपयोग लक्षात आल्यावर अमेरिकेत योगाचे पेव फुटले यात नवल नाही मात्र सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या अमेरिकन लोकांनी त्यातही हॉट योगा, पॉवर योगा असे प्रकार आणले. सध्या तेथे हॉट योगाबरोबर गोट योगा म्हणजे बकरी योगाही अतिशय लोकप्रिय ठरला आहे. या क्लासमध्ये जाऊन योगाभ्यास करण्यासाठी इच्छुक रांगा लावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ओरेगॉन प्रांतातील लेनी मोर्स हिचे नो रिग्रेट नावाचे एक फार्म आहे तेथे ती योगाचे प्रशिक्षण देते. तिच्याकडे बकर्‍या आहेत व त्यांना सोडून अन्यत्र जाण्याची तिची तयारी नाही. यामुळे शेतातच तिने हे येाग क्लास सुरू केले आहेत. योगा करत असताना या बकर्‍या इकडेतिकडे स्वैर संचार करत असतात. योग करणार्‍यांच्या अंगावर चढतात, उड्या मारतात. हे पाहूनच लेनीला गोट योगाची कल्पना सुचली व त्यातून हे कलास तिने सुरू केले व पाहता पाहता ते प्रचंड यशस्वीही झाले. सध्या येथे १२०० जण योगासाठी येतात व नंबर लागण्यासाठी मोठमोठ्या रांगाही लागतात. कांही जण मात्र गोट योगा पाहण्यासाठीही आवर्जून येतात.

Leave a Comment