मुंबई – ‘व्होडाफोन ४ जी’वर चौपटीने जास्त डेटा बोनान्झा व्होडाफोन या दूरसंचार सेवा कंपनीने जाहीर केला असून १ ते १० जीबी डेटा पॅक खरेदी करणारे ग्राहक आता ४ ते २२ जीबी २५० रुपयात आणि ९९९ रुपयात अनुक्रमे खरेदी करू शकतात. हे पॅक व्होडाफोनच्या सर्व ४ जी ऑफर सेवांच्या सर्व चक्रांवर उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी कंपनीकडून या प्लॅनच्या डेटामध्ये वाढ करण्यात आली.
चारपट जास्त डेटा देणार व्होडाफोन
सध्या २५० रुपयांच्या प्लॅनवर १ जीबी ४ जी डेटा मिळतो. आता याच किमतीत २८ दिवसांसाठी ४ जीबी डेटा मिळणार आहे. ९९९ रुपयांत २२ जीबी डेटा मिळेल. ज्या सर्कलमध्ये कंपनीची ४ जी सेवा आहे, तेथे हा प्लॅन सुरू करण्यात आला आहे. आमचे ग्राहक ऑनलाईन जास्त माहिती घेतात आणि व्हिडिओ पाहतात. या सुपर रिच डेटा पॅकच्या साहाय्याने आमचे १७ सर्कलमधील ४ जीची ग्राहकसंख्या झपाटय़ाने वाढत असून, ग्राहकांनी जास्तीत जास्त मोबाईल इंटरनेट वापरुनही व्होडाफोन सुपरनेट ४ जी टीएमबरोबर आत्मविश्वासाने जोडलेले राहू शकत आहेत. पहिल्यांदाच आणि मर्यादितपणे मोबाईल इंटरनेट वापरणाऱयांना अधिकाधिक नेट वापरण्यास जास्तीचे मूल्य देऊन प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांना आवडणारी माहिती आता ते चौपटीने जास्त वेळ ऑनलाईन घेऊ शकतात. अगदी त्याच किमंतीत त्यासाठीत्यांना काळजी करण्याची आता गरजच नाही, असे व्होडाफोन इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी संदीप कटारिया म्हणाले.