एअर एशिया घडवणार फक्त ४०७ रुपयात हवाई सफर


ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअर एशिया या एयरलाइन्सने नवीन ऑफर लॉन्च केल्या असून एअर एशियाने ग्राहकांना अतिशय कमी दरात विमान प्रवास उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये केवळ ४०७ रुपयांमध्ये हवाई सफर करता येणार आहे. ही ऑफर फक्त डोमेस्टिक प्रवासासाठी आहे. शिवाय निवडक विदेशी मार्गावर देखील कंपनीने ग्राहकांना प्रवास भाड्यात मोठी सुट दिली आहे. पण ही ऑफर केवळ वनवे प्रवासासाठीच असणार आहे.

ग्राहकांना एअर एशियाच्या नवीन ऑफरनुसार केवळ ४०७ रुपयांमध्ये इंफाळ ते गोवाहाटी प्रवास करता येणार आहे. तर केवळ ८७७ रुपयांमध्ये गोवा ते हैदराबाद तसेच गोवा ते बंगळुरू पर्यंत प्रवास करता येणार आहे. या मार्गासोबतच कंपनीने अनेक मार्गाच्या प्रवासावर ग्राहकांना विविध ऑफर दिल्या आहेत. यात पुणे ते बंगळुरू, बंगळुरू ते हैदराबाद, कोच्ची ते बंगळुरू या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात प्रवास भाड्यात सुट दिली आहे. पण या सर्व ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १६ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यत तिकीट बुक करावी लागणार आहे. तसेच तुमची प्रवासाची तारीख ही मे २०१७ ते फेब्रुवारी २०१८पर्यत असावी लागणार आहे.

कंपनीने या ऑफरसोबतच विदेशी प्रवासासाठीही आकर्षक ऑफर ठेवली आहे. यात केवळ ९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना कुआलालम्पूर आणि बँकॉक पर्यंतचा एका बाजूचा प्रवास करता येणार आहे. या प्रवासासाठी ग्राहकांना १६ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ पर्यंत तिकीट बुक करावी लागणार आहे.

Leave a Comment