१ जुलैपासून लागू होणार जीएसटी


नवी दिल्ली: एक एप्रिल २०१७ मध्ये लागू होणारे जीएसटी आता लांबवणीवर गेले असून एक एप्रिल ऐवजी एक जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

उद्योगपतींसह सर्वसामान्य नागरिकांनाही जीएसटी लागू झाल्यास याचा मोठा फायदा होणार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाचा भार कमी होणार आहे. संपूर्ण देशभरात जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.

Leave a Comment