हंपीचे प्राचीन विरूपाक्ष मंदिर


सातव्या शतकातील हंपी या वैभवशाली राज्यात उभारले गेलेले विरूपाक्ष मंदिर हे भारतातील सर्वात जुने व दीर्घकाळ पूजाअर्चा होत राहिलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. तुंगभद्रेच्या दक्षिण काठावरचे हे शिवमंदिर त्याच्या भव्यपणामुळे तसेच नऊ मजली गोपुरांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे व दरवर्षी येथे साजर्‍या होत असलेल्या वार्षिक उत्सवाला लक्षावधींच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात.

हंपी या वैभवशाली राज्याच्या इतिहासाशी या मंदिराची नाळ जुळलेली आहे. या मंदिरासंदर्भात अनेक कथा आजही सांगितल्या जातात. सातव्या शतकातल्या या मंदिरात सुरवातीला कांही समाधी स्थळे होती व त्याची पुजा होत असे त्यानंतर मंदिराचा विस्तार होत गेला व येथे देवीदेवतांच्या प्रतिमा बसविल्या गेल्या तसचे दगडी बांधकामातील भव्य मंदिर, गोपुरे त्यावरील शिल्पकामाने नटविली गेली. ध्वजस्तंभ, दीपस्तंभ उभारले गेले व सभामंडप, रंगमंडप असे भव्य मंडपही उभारले गेले. येथे प्रसादासाठी भव्य स्वयंपाकघरही आहे.

पूर्व गोपुरातून आत प्रवेश केल्यानंतर मुख्य बांधकाम दिसते. मंदिरात पिंडी आहे व डावीकडे वैशिष्ठपूर्ण तीनमुखी नंदी आहे.मंदिराच्या खांबांवर कोरीव काम केले गेले आहे. नंदीच्या बाजूला असलेल्या भितीवर हंपीचा मोठा नकाशा आहे. राजा कृष्णदेवराय राजाने १५१० सालात बांधलेला तीन मजली मनोरा आजही सुस्थित आहे. मुख्य मंदिरात दरवाज्यावर आठ फुटी दोन द्वारपाल आहेत व गाभार्‍यात शिवलिंग आहे. तेथेही पंपा व भुवनेश्वरी देवी यांच्याही सुंदर मूर्ती आहेत.

Leave a Comment