स्मार्टफोन लँडलाईनमध्ये बदलणारे बीएसएनएलचे अॅप


खासगी दूरसंचार कंपन्यांशी तगडी स्पर्धा करणार्‍या सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने सोमवारी नवे अॅप लाँच केले असून त्यामुळे मोबाईल लँडलाईन फोन अथवा कॉर्डलेसमध्ये बदलला जाणार आहे. यामुळे घरात मोबाईल लँडलाईन नंबरशी जोडला जाईल व लँडलाईनपर्यंत न जाताही सहज संभाषण करता येईल. या अॅपबरोबरच कंपनीने मोबाईल टीव्ही सेवा डिटो टिव्ही सुरू केली आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांना डिटो टिव्ही अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल असे कंपनीचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

ते म्हणाले, आयओएस व अँड्रोईड ओएस असलेले मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट, टिव्ही, पीसीवर ही अॅप चालतील. त्यासाठी दर महिना २० रूपये अथवा २२३ रूपये भरून विशेष व्हाऊचर सेवा घेता येईल. यात ग्राहक ८० पेक्षा अधिक लाइव्ह चॅनल्स पाहू शकतील. त्यात एचडी चॅनल्सचाही समावेश आहे. अर्थात यासाठी ग्राहकाकडे बीएसएनएल लँडलाईन, मोबाईल व ब्रॉडबँड सेवा असणे गरजेचे आहे.

Leave a Comment