सॅमसंगने लॉन्च केला गॅलेक्सी सी-७ प्रो


मुंबई : आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीने बाजारात आणला असून या स्मार्टफोनचे नाव ‘सॅमसंग गॅलेक्सी सी-७ प्रो’ असे असून, चिनी वेबसाईटवर हा हँडेसट लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी सी-५ प्रो आणि गॅलेक्सी सी-९ प्रो या दोन स्मार्टफोनमधून या नव्या हँडसेटची झलक दाखवण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये गॅलेक्सी सी-७ प्रो स्मार्टफोन बेन्चमार्क साईट अंतूतूवरही लिस्ट केला होता.

गॅलेक्सी सी-७ प्रो हँडसेट अँड्रॉईड ६.०.१ मार्शमॅलोवर चालणारा असून, यामध्ये ५.७ इंचाचा १०८०पिक्सेल रिझॉल्युशन असणारा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिव्हाईसमध्ये २.२ गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६२५ चिपसेटसोबत ४ जीबी रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये F/१.९ अॅपर्चर आहे. बॅक कॅमेऱ्यातून ३० फ्रेम प्रति सेकंदाच्या वेगाने पूर्ण एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करता येणे शक्य आहे. इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबी असून, मायक्रोएसडीच्या मदतीने २५६ जीबी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता ३३०० एमएएच आहे. त्याचसोबत सी-७ प्रोमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे १३ हजार ६०० रुपये असण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर अजून या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही. चिनमधील स्मार्टफोन बाजारात प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

Leave a Comment