आता एटीएम वापरावरही येणार निर्बंध


मुंबई – एटीएममधून वारंवार पैसे काढण्यावर मिळणार्‍या सवलती यापुढेही कायम राहतील, अशी आशा तुम्हाला असेल तर ती चुकीची आहे. कारण, सरकार लवकरच एटीएम वापरावरही निर्बंध आणण्याची शक्यता आहे. सध्या एका महिन्यात 8-10 वेळा एटीएममधून पैसे काढल्यास फी आकरल्या जात नाही. मात्र, यापुढे महिन्यातून फक्त 3 वेळाच मोफत पैसे काढता येणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्र्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. फ्री एटीएम ट्रांजेक्शन्सची संख्या कमी करून दरमहा तीन करण्यात यावी, असा मुद्दा चर्चेत उपस्थित करण्यात आला. यामुळे कॅश व्यवहार काही प्रमाणात कमी होतील, असे मत व्यक्त करण्यात आले.

बैठकीतील एका अधिकार्‍याने सांगितले की, नोटाबंदीच्या काळात चलनाचा तुटवडा असल्याने एटीएमच्या फ्री ट्रांजेक्शन्स वाढविण्यात आले होते. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा झाली आहे. आता तीन फ्री ट्रांजेक्शन्सला परवानगी दिल्यास लोकांकडून अधिकाधिक डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येईल.

सध्या बँकांकडून खातेदारांना दरमहा 5 एटीएम व्यवहारांवर कोणतीही शुल्क आकारली जात नाही. त्यानंतर होणार्‍या प्रत्येक व्यवहारावर 20 रुपये आणि सर्व्हिस टॅक्स आकारला जातो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू आणि हैदराबाद या शहरात दुसर्‍या बँकांच्या एटीएममधून तीनवेळा मोफत एटीएम व्यवहार करता येतो. तर अन्य शहरांमध्ये पाचवेळा ही सुविधा उपलब्ध आहे. हा नियम नोव्हेंबर 2014पासून लागू आहे.

Leave a Comment