वैष्णोदेवी मंदिरातील जुनी गुफा भाविकांसाठी खुली


जम्मू – जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर असलेल्या जगप्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरातील जुनी आणि प्राकृतिक गुफा आज भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.

श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पीयुष सिंगला यांनी सांगितले की, भाविकांच्या दर्शनासाठी ही गुफा उघडण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी एसडीएम भवनाला याबाबत माहिती देण्यात आली असून येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

सिंगला म्हणाले, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भाविकांची गर्दी कमी असल्याने वैष्णोदेवी मंदिरातील जुनी गुफा दर्शनासाठी उघडण्यात येते. अन्य महिन्यांमध्ये भाविकांना गर्भगृहात जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या नवीन गुफामधूनच जावे लागते.

Leave a Comment