लेनोव्होने स्वस्त केला झेड २ प्लस स्मार्टफोन


मुंबई : ‘लेनोव्हो झेड२ प्लस’ या स्मार्टफोनच्या किंमतीत लेनोव्होने भारतीय बाजारपेठेत मोठी कपात केली असून सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांनी दोन्ही व्हेरिएंटच्या किंमती स्वस्त करुन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची मूळ किंमत १७ हजार ९९९ रुपये होती. आता या व्हेरिएंटची किंमत ३ हजार रुपयांनी कमी करुन १४ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत १९ हजार ९९९ रुपये होती. आता या व्हेरिएंटची किंमत अडीच हजारांनी कमी करुन १७ हजार ४९९ रुपये करण्यात आली आहे. ई-कॉमर्स साईट अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टवरुन ‘लेनोव्हो झेड२ प्लस’चे दोन्ही व्हेरिएंट ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. काळा आणि सफेद रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Leave a Comment