कारचा खरा चालक ओळखणारे तंत्रज्ञान


डेल्टा आयडी कंपनीने गाडी चोरी रोखण्यासाठी तसेच खरा चालक ओळखणे सोपे व्हावे यासाठी नवे तंत्रज्ञान सादर केले आहे. कंझ्यूमर इलेक्टॉनिक शोमध्ये हे तंत्रज्ञान सादर केले गेले असून हे तंत्रज्ञान जेन टेक्स कार्पोरेशनच्या सहकार्याने ऑटो क्षेत्रात आणले गेले आहे. हे तंत्रज्ञान गाडीच्या रियर व्ह्यू मिररबरेाबर वापरले जाते.

या तंत्रज्ञानानुसार गाडीत बसलेल्या चालकाने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिले की त्याच्या डोळ्यांची म्हणजे बुबळाचे स्कॅनिंग(आयरिस) केले जाते त्यामुळे जो खरा चालक आहे, त्याचे स्कॅनिग मॅच केले जाते. यामुळे गाडीचा खरा चालकच गाडी सुरू करू शकतो पर्यायाने गाडी चोरी अथवा अन्य चालकाला कार सुरू करणे शक्य होत नाही. कॅब सेवेसाठी हे तंत्रज्ञान विशेष महत्त्वाचे आहे कारण यामुळे चालकाची ओळख पटत असल्याने कारमध्ये कोणतेही गैरकृत्य करणे चालकाला महागात पडू शकणार आहे.

जाणकारांच्या मते भारतात हे तंत्रज्ञान आधारकार्डशी लिंक करता येऊ शकेल. त्यामुळे ज्याचे आधार कार्ड प्रमाणित आहे, तोच गाडी चालवू शकेल.

Leave a Comment