आयकर विभागाने लावला बँकेत जमा न झालेल्या काळ्या पैशाचा छडा


नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर जमा न झालेल्या १५५० कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा छडा आयकर विभागाने लावला आहे. ही रक्कम काळापैसा करणाऱ्या रॅकेट्स आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बदलण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अहवालानुसार हवाला व्यवहारांच्या माध्यमातून काळा पैसा तयार होत आहे. काळ्या पैशाचे रॅकेट चालवणाऱ्या लोकांनी ८ नोव्हेंबरनंतर ९३० कोटींची रक्कम बेकायदेशीररित्या हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न केला होता.

आयकर विभागाने दिल्लीतील आणखी एका प्रकरणात ८० बँक खात्यातून २०० कोटी रुपयांची रक्कम काळ्याची पांढरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळवली आहे. अहवालानुसार याप्रकरणी नोएडातील एका बँकेतील १०० खात्यांची चौकशी सुरु आहे. नोएडातील या १०० खात्यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपये काळ्याचे सफेद करण्यात आले आहेत. दरम्यान आयकर विभागाने याप्रकरणी एंट्री ऑपरेटर आणि हवाला व्यवहार करणाऱ्यांविरोधात कोलकाता, गुरगाव, चरखी दादरी आणि कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये कारवाई करत आणखी २०० कोटींच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे.

Leave a Comment