हे आहेत जगात सर्वाधिक वापरले जाणारे कॉमन पासवर्ड


नवी दिल्ली : २०१६ या वर्षात कोणते पासवर्ड हे कॉमन होते हे पासवर्ड मॅनेजिंग किपर सेक्युरीटी या कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या एका सर्वेक्षणात सांगितले आहे. सर्वात जास्त वेळा यामध्ये १२३४५६ हा पासवर्ड वापरण्यात आला आहे. तर १२३४५६७८९ हा दुसऱ्या, qwerty हा पासवर्ड तिसऱ्या स्थानावर होता. password, welcome, dragon, login,google, 1q2w3e4r5t हे पासवर्ड देखील अनेकांनी ठेवले होते.

कॉमन पासवर्डच्या यादीत 12345678, 1234567890, monkey, 111111, 98754321 हे पासवर्ड देखील सामाविष्ट आहेत. गेल्या वर्षी देखील काही कॉमन पासवर्ड लीक झाले होते. तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवायचा असेल तर या २५ पैकी पासवर्डचा वापर करु नका. स्प्लॅशडेटाने आठ डिजीट तसेच त्यापेक्षा अधिक डिजीटचा पासवर्ड वापरण्यास सांगितले आहे. तसेच पासवर्डमध्ये विविध कॅरेक्टरर्स जसे लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉलचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहे.

गेल्या वर्षी लीक झालेले पासवर्ड – 123456 , password , 12345678 , qwerty, 12345 , 123456789, football , 1234 , 1234567 , baseball , welcome, 1234567890, abc123, 111111, 1qaz2wsx, dragon, master, monkey, letmein, login , princess, qwertyuiop, solo, passw0rd, starwars

Leave a Comment