लंडनच्या थेम्समध्ये उडणारया सीबबल टॅक्सी


लंडनच्या टेम्समध्ये या वर्षाच्या अखेरी फ्लाईंग टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या चाचण्या सुरू होत आहेत. सीबबल नावाने ओळखल्या जाणार्‍या या टॅक्सी एकावेळी चार प्रवासी वाहून नेऊ शकतात. त्या पाण्याच्या वर अडीच फुटांवरून उडतात तसेच चालकाविना चालू शकतात.या टॅक्सीना इंधनाची गरज नाही कारण त्या सोलर पॅनलमधून तयार होत असलेल्या उर्जेवर टर्बाईनच्या सहाय्याने चालू शकतात.

हायड्रोफॉइल्स तंत्रज्ञानाचा वापर या टॅक्सीसाठी केला गेला आहे. हायड्रोफॉईल्सच्या मदतीने त्या पाण्याच्या वर उचलल्या जातात. त्यामुळे त्या ताशी २५ नॉटिकल मैल वेगाने प्रवास करू शकतात. हा प्रवास अतिशय आरामदायी आहे असेही सांगितले जाते. टॅक्सींसाठी विशेष प्रकारचा नवीन डॉक बनविला जातो. या टॅक्सीच्या खालच्या पाण्यत टर्बाईन्स येतात. सोलर पॅनल व टर्बाईन्स यातून निर्माण झालेल्या उर्जेवर त्या चालतात. या टॅक्सी पाणी ढकलत नाहीत तर पाणी चिरतात त्यामुळे लाटा येत नाहीत तसेच पाण्याचा ४० टक्के दबाव कमी होतो. या बोटींच्या ट्रायल्स पॅरिसमध्ये घेतल्या गेल्या आहेत. २०१७ मध्ये लंडनमध्ये त्यांची प्रात्यक्षिके होणार आहेत.

जगातील बहुतेक सर्व मोठी शहरे समुद्र अथवा नदीकाठांवर आहेत. प्रदूषण कमी करणे व इंधन बचत या दोन्ही साठी ही टॅक्सीसेवा आदर्श ठरू शकते असे तज्ञांचे मत आहे. या टॅक्सीचे डिझाईन फ्रान्समधील डीबोल्ट यांनी केले आहे. त्यांची किंमत २५ हजार पौंडांपर्यंत आहे.

Leave a Comment