मार्चनंतरही फुकट मिळणार सेवा!


नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ लॉन्च केल्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये टेरिफ वॉर सुरु झाले. एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी जिओने फ्री ऑफर दिल्यानंतर त्यांच्या टेरिफच्या किंमती कमी केल्या. किंमतीवरुन सुरु झालेले युद्ध अजूनही थांबतांना दिसत नाही आहे. पण याचा फायदा मात्र ग्राहकांना नक्की होत आहे.

टेलिकॉम क्षेत्रामधील तज्ज्ञांच्या मते, जिओ मार्चनंतर ही फ्री ऑफर कायम ठेऊ शकते. सध्या रिलायंस इंडस्ट्रीज आर्थिक बाबतीत मजबूत स्थितीत असल्यामुळे जिओ अधिक वेळ या टेरिफ वॉरमध्ये राहू शकतो. रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

Leave a Comment