पेट्रोल पंपावर करा कार्ड पेमेंट; तीन दिवसांत ०.७५% कॅश बॅक


मुंबई – पेट्रोल पंपावर क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटवरून बँक आणि तेल कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या वाद अडकलेल्या सरकारने बँकांना तीन दिवसांत ग्राहकांना कॅशबॅक देण्याची सुचना केली आहे. केंद्र सरकारने सर्व बँकांना आदेश दिला आहे की, त्यांनी तत्काल ग्राहकांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर कॅशबॅक जमा करावी. दोन वरिष्ठ बँक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने बँकांना आदेश दिले आहेत की पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट करणार्‍यां ग्राहकांना 0.75% कॅशबॅक मिळणार असल्याची माहिती एसएमएसद्वारे कळवावी. तसेच तीन दिवसांच्या आत ही रयकम ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा करावी.

मात्र, काही ठिकाणी कनेक्टीव्हिटी कमी असल्याने ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती कशी द्यावी, ही चिंता बँकांना आहेत. सरकारने हा आदेश अशा वेळी दिला आहे, ज्यावेळी पेट्रोल पंपावर कार्डचा वापर कमी प्रमाणात होत आहे. दरम्यान, कार्ड पेमेंटवर आकारण्यात येणारा एमडीआर चार्ज पेट्रोलियम कंपन्या करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

तेल कंपन्या भरणार एमडीआर चार्ज

मागील आठवड्यात पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोलविलेल्या बँकांच्या सीईओ आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने ई-पेमेंट करणार्‍यांसाठी विविध सवलती जाहिर केल्या होत्या. यात पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट करणार्‍यांना 0.75 टयके कॅशबॅकची सवलत देण्यात आली होती. तसेच पेट्रोल पंपावर कार्डद्वारे होणार्‍या खरेदीवर आकारण्यात येणारा एमडीआर चार्ज ऑईल मार्केटिंग कंपनीने भरावा, असा आदेश दिला होता.

Leave a Comment