पुर्णतः सुरक्षित आहे व्हॉट्सअॅप संदेश आणि कॉल


न्यूयॉर्क – आम्ही आमच्या प्रणालीमध्ये कोणत्याही सरकारला हस्तक्षेप करु देत नाही. व्हॉट्सअॅप गरज पडली, तर युजर्सच्या गोपनियतेसाठी सरकार विरोधात लढण्यास तयार असेल, असे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेबद्दल ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने अहवाल दिला होता. व्हॉट्सअॅपकडून हा अहवाल चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असून एका अहवालात व्हॉट्सअॅपवरील मेसेजच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. व्हॉट्सअॅपमध्ये सुरक्षा त्रुटी असल्यामुळे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर होणारे खाजगी संभाषण इतरांद्वारे वाचले जाण्याची शक्यता आहे, असा दावा वृत्तपञाने केला होता.

याबाबत माहिती देताना व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन एक्टन यांनी सांगितले, की २०१६च्या एप्रिल महिन्यापासुनच व्हॉट्सअॅप कॉल आणि संदेश पुर्णतः सुरक्षित झालेले असून या सुरक्षेला भेदून हे संदेश कोणत्याही प्रकारे वाचणे अशक्य असल्यामुळे वृत्तपत्राचा दावा पोकळ आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपतर्फे प्रसिद्ध केलेल्या माहीती पत्रकात व्हॉट्सअॅपच्या एन्ड टु एन्ड एनक्रिप्शन प्रणालीबद्दल माहीती दिली आहे.

व्हॉट्सअॅपवरील संभाषणाच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी अपडेट देण्यात येतात. ज्यामध्ये नवीन फिचर्ससह अधिक सुरक्षा ही देण्यात येते. तसेच व्हॉट्सअॅपने जुन्या स्मार्टफोनला सपोर्ट काही दिवसांपूर्वीच बंद केला आहे. अँड्रॉईड २.२ (फ्रोयो) या अँड्रॉईडच्या जुन्या वर्जन तसेच आयफोन ३ जीएस व आयओएस ६ व त्यापेक्षा आधीच्या ओएसवर चालणाऱ्या स्मार्टफोनवरही व्हॉट्सअॅप बंद केले आहे.

Leave a Comment