देशोदेशीच्या जिद्दी इमारती


शहरीकरणाचा वाढता वेग व आधुनिक इमारतींची उभारणी जगभरात सुरूच आहे. भारतात अनेकदा रस्ता रूंदी करायची आहे पण रस्त्याच्या मध्येच असलेल्या घरांमुळे रस्ता रूंदी वर्षानुवर्षे रखडल्याचे चित्र नेहमीचे आहे. अर्थात ही फक्त भारताची खासियत नाही तर जगातील चांगल्या पुढारलेल्या व विकसित देशातही अशा हट्टी इमारती आजही उभ्या आहेत व तेथील पॉवरफुल सरकारे त्यांचे कांहीही वाकडे करू शकलेली नाहीत. अशाच काही इमारतींची माहिती.


चीन, अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड अशा देशात या जिद्दी इमारती पाहायला मिळतात. कांही रस्त्यांच्या मध्ये, कांही हायवेंच्या मध्ये, कांही उंच उंच इमारतींच्या मध्ये या इमारती उभ्या आहेत. या येथून न हटण्यामागे सरकार अथवा विकसकांनी देऊ केलेले मूल्य घर मालकाने मान्य केलेले नाही हेच कारण आहे. चीनच्या वेनलिग भागात अशीच एक तीन मजली इमारत आहे. २०१२ मध्ये हा हायवे झाला पण ही इमारत हलविता आलेली नाही. नेल हाऊस असे त्याला संबोधले जाते व त्याचा अर्थच मुळी हटविणे मुश्कील असलेले घर असा आहे.

अशा जिद्दी इमारतींमुळे होते काय की आसपासचे जग बदलते पण इमारती मात्र तेथेच राहतात. दक्षिण पूर्व चीनमध्ये शेन्जेन भागात रेल्वे स्टेशनला खेटून अशीच एक इमारत आहे. अमेरिकेतील सिएटलमध्ये मॉलच्या मध्येच एक छोटेसे घर असेच ठाण मांडून बसले आहे तर स्वित्झर्लंडच्या झुरीच ब्रुनाऊ रस्त्याच्या मधोमध असेच हट्टी घर २००७ पासून आहे. वॉशिंग्टन डीसी म्हणजे अमेरिकेच्या राजधानीत उंच इमारतींच्या मध्येही असेच एक घर आहे. या घराच्या बदली मालकाला ३० लाख डॉलर्स देऊ करण्यात आले होते मात्र मालकाने ते घर विकलेले नाही. चीनमध्ये तर तीन हायवेच्या मध्ये एका शेतकर्‍याचे घर आहे व तो आपले शेत, शेळ्या मेंढ्यासह तेथे मुक्काम ठोकून आहे.

Leave a Comment