चिरतरूण ठेवणारा जांभळा बटाटा


वय वाढणे कुणालाच नको असते. चेहर्‍यावर जरा कुठे सुरकुती येऊ लागली, केस पांढरे होऊ लागले की या ना त्या प्रयत्नाने तरूणपण जपण्याचा प्रयत्न सुरू केला जातो. आता मात्र वय लपविण्याची गरज फारशी उरणार नाही असे दिवस येऊ घातले आहेत. म्हणजे ब्यूटी पार्लरमध्ये न जाताही चिरतरूणपण देणारी संजीवनी सापडली आहे. ही संजीवनी म्हणजे एकप्रकारचा बटाटा आहे.

नेहमीचा बटाटा व जंगली बटाटा यांच्या संकरातून हा बटाटा तयार होतो. प्रथम तो टेस्ट ट्यूबमध्ये तयार करून नंतर त्याची रोपे शेतात लावली जातात. यात आरारूटचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्याचा रंग जांभळा दिसतो मात्र चवीला कोणताही फरक लागत नाही. या बटाट्यात आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे तसेच तो खाल्यानंतर वय वाढण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे म्हातारपण उशीरा येते. यात अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण नेहमीच्या बटाट्याच्या चौपट तर सी व्हीटॅमिनचे प्रमाण नेहमीच्या बटाट्याच्या तिप्पट आहे.

विशेष म्हणजे उकडविल्यानंतरही हा बटाटा तसाच जांभळा व चमकदार दिसतो.

Leave a Comment