याला म्हणतात चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला


लंडन – भारतीय हॉटेलमध्ये जेवणांच्या सहा हजारांच्या बिलासोबत एका धनाढ्य व्यवसायिकाने ८३ हजारांची बक्षिसी दिली आहे. जेव्हा ही बक्षिसी पोर्टडाऊन येथील द इंडियन ट्री रेस्टॉरंटमधील कर्मचा-यांनी पाहिली, तेव्हा त्यांचाही काही वेळासाठी विश्वासच बसला नाही. आपले नाव जाहीर न करण्याची या व्यवसायिकाने विनंती केली आहे.

याबाबत एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार या व्यवसायिकाने आपले नाव जाहीर न करण्याची अट घालत आपण २००२ पासून आपण या रेस्टॉरंटमध्ये येत असल्याचे सांगितले आहे. ‘येथील शेफ बाबू यांच्या हातचे जेवण आपल्याला प्रचंड आवडते. जेव्हा कधी मी घरी येतो तेव्हा त्यांच्या हातचे जेवण नक्की जेवतो, असे या व्यवसायिकाने म्हटले आहे.

२००२ पासू बाबू यांचे ते व्यवसायिक ग्राहक आहेत. ते सध्या दुस-या देशात राहायला गेले असल्याने जेव्हा कधी घरी परत येतात तेव्हा फोन करुन बाबू आज जेवणासाठी काय करत आहेत याची माहिती घेतात. ते आधी येथे येतात आणि नंतर घरी जातात, असं रेस्टॉरंटच्या मालक लुना एकूश सांगतात. आमच्याकडील सर्व्हिस आणि जेवणावरुन सगळे खूश आहेत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, त्यादिवशी त्यांनी बाबू यांना बोलावले आणि आपण एक छोटीशी गोष्ट देऊन तुमचे धन्यवाद मानत असल्याचे सांगितले. आमच्या सर्वांचे लक्ष तिकडे गेले, पण ही नक्कीच छोटी गोष्ट नव्हती, असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment