या वाळवंटात शतकानुशतके निनादते आहे संगीत


मोरक्को या देशाच्या वाळवंटात शतकानुशतके प्रवास करणार्‍यांना संगीताचे सूर ऐकू येत आहेत मात्र हे संगीत कसे ऐकू येते व ही वाद्ये कोण वाजवते याची माहिती मात्र मिळत नाही. मोरक्कोचे हे वाळवंट राहण्यायोग्य नाही म्हणजे तेथे वस्ती नाही मग तरीही विविध वाद्यांचे आवाज येतात यामागे येथे भूत प्रेत आत्मे आहेत असा लोकांचा समज आहे. प्रवाशांना घाबरविण्यासाठी भूतेच ड्रम, गिटार, व्हायोलिन वा अन्य वाद्यंचे सूर निर्माण करतात असे मानले जाते.

१३ व्या शतकात प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो या वाळवंटात आला होता तेव्हा त्यानेही त्याच्या प्रवासवर्णनात वाद्यांचे सूर ऐकल्याचे नमूद केले आहे. अनेकांनी या संगीतामागचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र हे रहस्य उलगडलेले नाही. वैज्ञानिकांनी मात्र याचे उत्तर शोधले आहे. त्यांच्या मते वाळवंटात नेहमीच वारे वाहतात व त्यामुळे रेतीचे डोंगर बनणे व वाळू उडून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे सुरू असते. वाळू वजनाला जड असते. वार्‍यामुळे जेव्हा डोंगराखालची वाळू घसरू लागते तेव्हा वाळूचे कण किती मोठे आहेत व वार्‍याचा व वाळू घरसण्याचा वेग किती आहे त्यानुसार वेगवेगळे आवाज निर्माण होतात. वारे जोरात असतील तर वाळू घसरण्याचा वेग वाढतो व त्यातूनच असे आवाज निर्माण होतात. कांहीही असले तरी या वाळवंटाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा तरी येथे भेट दिली पाहिजे.

Leave a Comment