मकरसंक्रांतीला यंदा दुर्मिळ योग


सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो काळ मकरसंक्रांत म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे धर्मात विशेष महत्त्व आहे कारण याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे या दिवसापासून थंडीची तीव्रता कमी होऊ लागते व दिवस मोठा होऊ लागतो. त्या निमित्ताने स्नान, दान व पूजा यांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र सरोवरे, नद्या, समुद्रात स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. दरवर्षी संक्रांत बहुदा १४ जानेवारीला येते.

यंदाची मकर संक्रांत विशेष योगाची आहे कारण ती शनिवारी येत आहे. शनिदेव हा सूर्याचा पुत्र मानला जातो. सूर्य या दिवशी शनिदेवाकडे येतो म्हणजे मकर राशीत येतो तो दिवस यंदा शनिवार आहे. शनी हा मकर व कुंभ राशींचा स्वामी मानला जातो. दर महिन्यालाच संक्रांत येत असते. संक्रांत म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश. पण मकर राशीत जेव्हा सूर्य प्रवेश करतो ती मकर संक्रांत म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्म मान्यतेप्रमाणे उत्तरायणापासून देवतांचा दिवस सुरू होतो. दक्षिणायन ही देवतांची रात्र मानली जाते.


संक्रांतीपासून हिवाळा कमी होतो व यामुळेच या काळात तीळ, गूळ, बाजरी, उस यापासून बनविलेले पदार्थ आहारात घेण्याची प्रथा आहे. ऋतू बदलत असताना शरीरात होत असलेले बदल व त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून या प्रकारचा आहार घेतला जातो. संक्रांतीदिवशी भारतात पतंग उडविण्याची प्रथा फार जुनी आहे.

Leave a Comment