फ्यूचर ग्रुपची ट्विटर डिस्काऊंट ऑफर


नवी दिल्ली – बिग बाजार आणि ईजीडेसह अनेक रिटेल स्टोअर्स चालविणार्‍या फ्यूचर ग्रुपने सोशल नेटवर्किंग प्लेटफॉर्म टि0टरच्या मदतीने महिन्यातून दोनदा आपल्या काही उत्पादनांवर डिस्काऊंट ऑफर सुरू केली आहे. हा डिस्काऊंट तुम्ही किती वेळा अनाऊंसमेंटला रीटि0ट करता यावर ठरणार आहे.
ट्विटरवर सुरू करण्यात आलेल्या फ्यूचर ग्रुपच्या #Decide YourPrice वर दर गुरुवारी ही ऑफर असणार आहे. दर गुरुवारी ग्रुपकडून सायंकाळी 6 वाजता एका उत्पादनावर सवलत जाहीर करण्यात येईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत जितक्या वेळेस अनाऊंसमेंट रीट्विट करण्यात येईल तेवढ्या वेळेस त्या उत्पादनाच्या किमतीत एका रुपयांची सुट मिळेल. त्यानंतर उत्पादनावरील सुट निश्‍चित करून दोन दिवसांनी शनिवार आणि रविवारी देशभरातील बिग बाजारमध्ये ते सर्व ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात.

फ्यूचर ग्रुप इंडियाचे ग्रुप हेड-डिजिटल पवन सादरा म्हणाले, या योजनेचे आतापर्यंत दोन राऊंड झाले असून त्याला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेतील सुट ही मॅयिसमम रिटेल प्राईसवर मिळत नाही, तर स्टोअरमधील प्रॉडयटच्या सेलिंग प्राईसवर देण्यात येते. त्या प्रोडक्टवर किती डिस्काऊंट द्यायचा हे शेवटी कंपनीच निश्‍चित करते.

डिसेंबरमध्ये पहिल्यांदा या सेलमध्ये 1999 रुपये किमतीचा लॅपटॉप बॅग बिग बाजारच्या स्टोअर्समध्ये 999 रुपयांमध्ये ऑफर करण्यात आला होता. जो शनिवारी आणि रविवारी डिस्काऊंटसह 403 रुपयांना विकण्यात आला. या दोन दिवसांत बिग बाजारमध्ये सुमारे 10,000 बॅगची विक्री झाली. जी आठवड्याच्या अन्य दिवसांमध्ये फयत 250 बॅगची विक्री होत होती. दुसर्‍या ऑफर सेलमध्ये युवकांचा जास्त प्रतिसाद मिळाला. कारण यावेळी डिस्काऊंट ऑफर ही डेनिम जींसवर देण्यात आली होती. बिग बाजारमध्ये 1399 रुपये विक्री किंमत असणार्‍या पॅटवर रिट्विटनंतर डिस्काऊंटसह 894 रुपयांना विकली.

Leave a Comment