गुजरात सरकारसाठी ड्रोन बनवणार १४ वर्षाचा मुलगा


अहमदाबाद – अनेक बडया कंपन्या आणि गुजरात सरकारमध्ये दरवर्षी आयोजित होणा-या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत करार होतात. वायब्रंट गुजरातमध्ये यावर्षी एक अनोखी घटना घडली असून सर्वत्र ज्याची चर्चा आहे. गुजरात सरकारबरोबर ड्रोन निर्मितीचा तब्बल ५ कोटी रुपयांचा सामंजस्य करार या परिषदेत सहभागी झालेल्या एका १४ वर्षाच्या मुलाने केला आहे.

या मुलाचे नाव हर्षवर्धन झाला असे असून त्याच्यासोबत गुजरात सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने ड्रोन निर्मितीचा करार केला आहे. युद्धभूमीवर शत्रूने पेरलेली भूसुरुंग शोधून ती निकामी करणारे ड्रोन विकसित हर्षवर्धन करणार आहे. आपल्या बिझनेस प्लानसह सहभागी झालेल्या हर्षवर्धनने ड्रोनचे तीन नमूने बनवले होते.

हर्षवर्धन सध्या १० व्या इयत्तेत असून त्याच्या वयाची मुले दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेची तयारी करत आहेत. हर्षवर्धनने २०१६ पासून भुसुरुंग निकामी करणा-या ड्रोन प्रकल्पावर काम सुरु केले. हाताने भुसुरुंग निकामी करताना जवानांचा मृत्यू होतो ते जखमी होत असल्याचे मी टीव्हीवर पाहिले होते. त्यावेळी मला अशा प्रकारचे ड्रोन विकसित करण्याची कल्पना सुचली असे हर्षवर्धनने सांगितले. पाच लाखाचा खर्च हर्षवर्धनने बनवलेल्य़ा तीन ड्रोनसाठी आला. पहिल्या दोन नमुन्यांसाठी पालकांनी त्याला २ लाख रुपये दिले. त्यानंतर ३ लाख रुपये त्याला सरकारने दिले.

Leave a Comment