एचटीसीचे यू अल्ट्रा व यू प्ले स्मार्टफोन लाँच


एचटीसीने गुरूवारी त्यांचे दोन नवे स्मार्टफोन यू सिरीजखाली सादर केले आहेत. यू अल्ट्रा व यू प्ले या नावाने आणलेल्या या स्मार्टफोनसाठी सेंसर कंपॅनियन फिचर दिले गेले आहे. युजर त्याचा फोन कसा वापरतो त्यावर नजर ठेवून त्यानुसार सल्ला देण्याचे काम हे फिचर करेल. हे फोन भारतात मार्चमध्ये येतील असेही सांगितले जात आहे. दोन्ही फोनच्या किंमतींबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या फोनसाठी अँड्राईड ७.० नगेट ओएस दिली गेली आहे.

यू अल्ट्रा वन व ड्युएल सिम अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये आहे. या फोनसाठी ५.७ इंची सुपर एलसीडी डिस्प्ले आहे तसेच २ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी साठी स्क्रीनला गोरिल्ला ग्लास फाईव्ह तर १२८ जीबी मेमरी स्क्रीनला सफायर ग्लास प्रोटेक्शन दिले गेले आहे. ४ जीबी रॅम, १२ अल्ट्रापिकचा रियर तर १६एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून फोनची मेमरी मायक्रो कार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे.

यू प्लेसाठी ३ जीबी रॅम ३२ जीबी इंटरनल मेमरी व ४ जीबी रॅम ६४ जीबी इंटरनल मेमरी अशी दोन ऑप्शन्स आहेत. या फोनसाठी ५.२ इंची फुल एचडी डिस्प्ले गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह आहे. १६ एमपीचा रियर व फ्रंट कॅमेरा दिला अ्रसून या फोनची मेमरीही कार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविता येणार आहे. दोन्ही साठी होम बटण फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

Leave a Comment