१०० रुपयाची चपटी पडली चक्क १० हजाराला


अहमदाबाद : तळीराम हा एक असा प्राणी आहे त्याला एक दिवस जरी दारु मिळाली नाही तर तो त्या दारूसाठी अधिकचे पैसे मोजण्यास देखील तयार असतो. पण गुजरातमध्ये एका तळीरामाला १०० रुपयाची चपटी (दारूची बाटली) चक्क १० हजार रुपयात पडली आहे. हा तळीराम सध्या पिण्याच्या चक्करमध्ये आता जेलची हवा खात आहे.

या तळीरामाचे नाव रणजीत वाघेला असे असून तो बोपल परिसरात राहतो. दारू जवळ बाळगल्यामुळे त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. अवघ्या गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे तिथे दारू बाळगणा-यांवर नेहमीच कारवाई होत असते. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला जामीन मिळाला. न्यायालयाने १० हजाराच्या जामिनावर त्याची सुटका केली आहे. त्यामुळे त्याला १०० रुपयाच्या चपटीसाठी चक्क १० हजार रुपये मोजावे लागले.

या आधीही रणजीतचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागली होती. अखेर नुकताच त्याला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. मात्र तिथे अनेक ठिकाणी राजरोजपणे दारू विकली जाते. त्यामुळे सरकारवर टीका होत असल्यामुळे येथील सरकारने दारूबंदीसंबंधी कायदा कठोर करून त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता याचा मोठा फटका तळीरामांना बसताना दिसत आहे.

Leave a Comment