स्टॅन्डविना उभी राहणार होंडाची नवी बाईक


नवी दिल्ली: कार-बाईक्सवर एकापेक्षा एक संशोधन जगभरातकेले जात आहेत. नव्या डिझाईन आणि नव्या आकर्षक फिचर्ससह बाईक्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लॉन्च केल्या जात आहेत. यात होंडाही आता आपली एक नवी धमाकेदार बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत असून होंडाने ही शानदार बाईक नुकतीच लासवेगासमध्ये सादर केली. सेल्फ बॅलेंसिंग अशी ही बाईक आहे, जी स्टॅन्ड शिवायही उभी राहू शकते. आता या बाईकच्या फिचर्सबद्दल तुम्ही विचार करत असाल? त्यामुळेच आम्ही तुम्हाला या बाईकची वैशिष्ट्य़े घेऊन आलो आहोत.

तंत्रज्ञान आज एवढे पुढे गेले आहे की, बाईक्सवर नवनवे अविष्कार केले जात आहे. तेच होंडाने देखील केले आहे. अनेक नवे आकर्षक फिचर्स होंडाच्या या नव्या बाईकमध्ये आहेत. ही बाईक स्टॅन्ड शिवायही उभी राहू शकते. म्हणजेच ही बाईक सेल्फ बॅलेंसिंग आहे. लास वेगासमध्ये नुकतेच ‘कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ पार पडला. यात जगभरातील कंपन्यांनी आपल्या नव्या बाईक्स सादर केल्या. त्यात होंडाचाही समावेश होता. होंडाने सादर केलेल्या बाईकमध्ये स्टॅन्ड नाही. ही बाईक स्टॅन्डशिवायही उभी राहू शकते.

ही बाईक अजिबात हलणार नाही. यासोबतच पडणारही नाही. या बाईकमध्ये अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. असे सांगितले जात आहे की, या बाईकचा स्पीडही चांगला आहे. या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टीअर बाय द वायर सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. तर होंडांच्या अधिका-यांनी माहिती दिली की, ही बाईक सिलिकॉन व्हॅली येथील रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये तयार केली जाणार आहे. कंपनीला पूर्ण विश्वास आहे की, ही नवी बाईक ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.

Leave a Comment