मॅरेथॉनमध्ये धावणार १०३ वर्षांचे आजोबा


मुंबई – येत्या १५ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये मूळचे नाशिकच्या मालेगावचे रहिवासी असलेले १०३ वर्षांचे दगडू भामरे हे वयोवृद्ध आजोबाही धावणार आहेत.

यंदा ‘स्टँडर्ड चार्टर्ड’तर्फे आयोजित होणाऱ्या मॅरेथॉनचे १४वे वर्ष असून या मॅरेथॉनमध्ये लहानांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांचा सहभाग असतो. यंदा १०३ वर्षांचे भामरे यात सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये धावणारे भामरे हे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. त्यांची मॅरेथॉनमध्ये धावण्याची ही दुसरी वेळ असून अजूनही ठणठणीत असलेले दगडू भामरे हे मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी खूपच उत्सुक असतात. दिवसातून साधारण ४.३ किलोमीटर ते चालतात आणि इतकेच नाही तर आठवडय़ातून दोन वेळा ४ ते ५ किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांनी स्वतच्या शरीराला हा नियमच घालून घेतला आहे.

Leave a Comment