भारतात फकत धोनीकडे आहे ही बाईक


टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वी पार पाडलेला कॅप्टन कूल धोनी याचे बाईक वेड सर्वश्रुत आहे. निजा कावासाकी झेड एक्स १४ आर, हार्ले डेव्हीडसन, फॅटबॉय, दुकाती १०१९ अशा एकापेक्षा एक जबरदस्त २२ बाईक धोनीकडे आहेत. मात्र त्यातील सर्वात खास आहे ती कॉन्फिडरेट एक्स ३२ हेलकॅट ही बाईक. ही बाईक ऐतिहासिक आहे. हॉलीवूड अभिनेते ब्रॅड पिट, टॉम क्रूझ, रायन रेनॉल्डस, व फुटबॉल स्टार डेव्हीड बेकहम यांच्याकडेही अशी बाईक आहे. मात्र दक्षिण पूर्व आशिया व भारतात ही बाईक फक्त धोनीकडे आहे.

ही बाईक अतिशय पॉवरफुल अशा हेलकॅट सिक्स या लढाऊ विमानापासून प्रेरणा घेऊन बनविली गेली आहे. हे विमान दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी वापरले गेले होते. ही बाईक बनविताना टायटॅनियमचा वापर केला गेला आहे व त्यामुळे ती वजनाला हलकी बनली आहे. धोनीच्या बाईकमध्ये कार्बन फायबरचा वापरही केला गेला आहे. तिला २.२ लिटरचे व्ही ट्विन इंजिन दिले गेले आहे. विशेष म्हणजे कंपनीने अशा फक्त १५० बाईकस बनविल्या होत्या. त्यामुळे आता ती कुणाला विकत घ्यायची असेल तर लिलाव अथवा सेकंड हँड मार्केटचाच शोध घ्यावा लागेल. अगदी मूळ मालकाला गाठून ती विकत घ्यायचा प्रयत्न असेल तरी तिच्यासाठी किमान ४७ लाख रूपये मोजण्याची तयारी हवी असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

Leave a Comment