भारतात आला लेनोव्हाचा तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन


मुंबई : भारतात लेनोव्हो कंपनीने आपला पी २ हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला असून तीन दिवस या फोनची बॅटरी चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.

या फोनला ५.५ इंचाचा फुल एचडी स्क्रीन देण्यात आला असून हा अँड्रॉईडच्या मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करतो व क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन या प्रोसेसरवर आधारीत आहे. फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असून मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. याच्या बॅटरीची क्षमता ५१०० मिलीअँपिअर असून जी १५ मिनिटांमध्ये दहा तासांपर्यंत चालण्याइतपत बॅटरी चार्ज होते. दोन व्हेरिएंट्समद्ये हा फोन उपलब्ध असून ३ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत १६९९९ तर ४जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत १७९९९ रुपये ऐवढी आहे.

Leave a Comment