जर्मनीने बनविले आपसात संवाद साधणारे रोबो


जर्मनीने उडणारे रोबो एकमेकांना धडकू नयेत यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने उडणारे विविध आकाराचे रोबो तयार केले आहेत. फुलपाखरे, जेली फिश, पेंग्विंग, कबुतरे अशा अनेक आकारात हे रोबो तयार केले गेले आहेत व त्याचे अनेक व्हिडीओही प्रसारित केले गेले आहेत.

फिशच्या आकाराचे रोबो पाण्यात पोहू शकतात तसेच हवेतही उडू शकतात. फुलपाखरांच्या आकाराचे रोबो नेहमीच्या फुलपाखराच्या आकारापेक्षा खूप मोठे आहेत. मात्र हवेत हव्या त्या दिशेने ते उडू शकतात. रिमोट कंट्रोलने त्यंाचे नियंत्रण करता येते. फिश रोबोसाठी वापरली गेलेली बॅटरी खूपच छोटी आहे तरीही ते ३ तास हवेत उडू शकतात. फुलपाखरांचे रोबो हवेत उडताना आपसात इलेक्ट्रॅनिक सिग्नल पाठवून एकमेकांशी संपर्कात राहतातच पण हवेत उडताना त्यांची टककर होत नाही. भविष्यात यामुळे उडणारे व तरीही एकमेकांशी टक्कर होण्याचा धोका नसणारे रोबो मोठ्या प्रमाणावर वापरायचा मार्ग या तंत्रज्ञानाने खुला केला आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment