रामदेव बाबांचा विश्वविक्रमी सूर्यनमस्कार


योगगुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत छत्तीसगडमधील भिलाई येथील जयंती स्टेडियमवर विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १ लाख लोकांनी या शिबिरात सूर्यनमस्कार आणि योगा करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे एक पथक या विश्वविक्रमावेळी उपस्थित होते. या विश्वविक्रमाची त्यांनी नोंद करून प्रमाणपत्रही दिले.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि योगगुरु रामदेव बाबा यांची या योग शिबिराला उपस्थिती होती. एक लाख लोकांनी या शिबिरात एकत्रित येऊन सूर्यनमस्कार केले. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी बाबा रामदेव यांच्या सोबत योग केले. या योग शिबिराला ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे पथकही हजर होते. त्यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेत प्रमाणपत्रही दिले. या आधी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत २०१६ मध्ये ५० हजार लोकांनी योग सादर करून विश्वविक्रम केला होता. आज १ लाख लोकांनी योग सादर केल्याने हा विक्रम मोडला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही