मिडीयाला टाळून उर्जित पटेल यांचे पलायन


आरबीआय चे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी नोटबंदी मुद्द्यावर प्रश्न विचारण्यासाठी जमलेला पत्रकारांचा मेळा पाहून चक्क मागच्या दाराने पलायन करण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला. बुधवारी व्हायब्रंट गुजराथच्या आठव्या समिट संमेलनासाठी ते महात्मा मंदिर येथे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहात होते. मोठ्या संख्येने पत्रकार आपली प्रतीक्षा करत आहेत हे लक्षात येताच पटेल यांनी मुख्य दरवाज्यातून बाहेर न पडता मागच्या दाराने बाहेर जाणे पसंत केले.

मात्र पत्रकारांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पटेल यांच्या मागोमाग धाव घेतली तेव्हा पटेल यांनी एका दमात दोन दोन पायर्‍या उतरत जिना पार करून अगोदरच उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीत प्रवेश केला व त्यांची गाडी तुफान वेगाने तेथून निघून गेली असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

Leave a Comment