दाढी कलर व्यवसायाची कोटीकोटी उड्डाणे


भारतात नोटबंदी झाल्यानंतर अनेक क्षेत्रातील उद्येाग अडचणींचा सामना करत असल्याच्या बातम्या नित्याने येत असताना भारतीय मर्दांमध्ये दाढी वाढविण्याचे व ती रंगविण्याचे प्रेम वाढल्याने दाढी कलर उद्योगाची भरभराट होत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षापासून दाढी वाढविण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे व त्यामुळे दाढी कलर उत्पादन करणारी कंपनी तेजीने वाटचाल करत असल्याचे समजते. या क्षेत्रात देशात सध्या फक्त जपानी बायपेन ही एकमेव कंपनी आहे.

केसांचे रंग बनविणार्‍या अनेक कंपन्या भारतात आहेत. त्यातील दिग्गज समजल्या जाणार्‍या लॉरियाल, गोदरेज यांनी दाढी कलर उद्येाग क्षेत्रात अद्यापी पदार्पण केलेले नाही. बायपेज कंपनीच्या दाढी कलर उत्पादनाची विक्री भारतात जे एल मॉरिसन इंडिया ही कंपनी करते. कंपनीचे ग्रुप मॅनेजर मजहर पटेल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, बायपेन कंपनीच्या मेन्स बिअर्ड कलर व्यवसायाने गतवर्षात देशात ४० टक्के वाढ नोंदविली आहे. भारतात सध्या दाढी वाढविण्याचा शौक वाढता आहे त्यामुळे दाढी कलर्सची मागणीही वाढती आहे. अर्थात अन्य कंपन्याही या क्षेत्रावर नजर ठेवून आहेत. जेसीबी इंडिया कंपनीचे सीईओ समीर श्रीवास्तव यांनी कंपनीने भारतात उत्पादन करण्यासाठी इटालीच्या कंपनीशी सहकार्य करार केला असल्याचे सांगितले.

Leave a Comment