व्हॉट्सअॅपमध्ये आले दोन नवे फीचर्स


मुंबई : गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने GIF सपोर्ट सुरु केले होते. व्हॉट्सअॅपने आता GIF शी संबंधित एक नवे फीचर आणले असून अँड्रॉईड बीटा व्हर्जन यूझर्ससाठी आता GIF चे पर्यायही दिले जातील, तुम्ही जे सर्च करुन समोरच्या यूझर्सना पाठवू शकता. त्याचसोबत फोटो पाठवण्याची मर्यादा नव्या अपडेटमध्ये १० वरुन ३० करण्यात येणार आहे.

हे नवे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जनचा वापर करणाऱ्या यूझर्सना मिळणार असून लवकर ऑफिशियल व्हॉट्सअॅप यूझर्सनाही अॅप अपडेटनंतर या फीचरचा अनुभव घेता येणार आहे. यूझर्सना इमोजीच्या पर्यायावर क्लिक केल्यावर GIF इमेज सर्च करण्याचा पर्याय मिळेल. यूझर्स या फीचरच्या मदतीने आपल्या आवडीनुसार वेगवेगळे GIF चॅटिंगदरम्यान वापरु शकतात.

दरम्यान याआधी व्हॉट्सअॅपवरुन इमेज शेअर करताना एकावेळी केवळ १० इमेज शेअर करण्याची सुविधा होती. मात्र, आता १० ऐवजी ३० इमेज शेअर करणे शक्य होणार आहे. यूझर्सना आता नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपची दोन्ही नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. सध्या बीटा अँड्रॉईड २.१७.६ व्हर्जन वापरणाऱ्यांनाच नव्या फीचरची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment