जिओच्या इंटरनेट स्पीड लय भारी


मुंबई – रिलायन्स जिओ भारतात ४जी सेवा देणा-या कंपन्यांमध्ये वेगाच्या बाबतीत सर्वोत्तम ठरला असून एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांना मागे टाकले असल्याचे ट्रायने म्हटले आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये जिओचा सर्वात कमी वेग असल्याचे दूरसंचार क्षेत्रातील नियामक ट्रायने सांगितले होते. रिलायन्स जिओच्या वेगात डिसेंबर २०१६ पासून पुन्हा वाढ झाली आहे.

देशातील इंटरनेट वेग मोजण्यासाठी ट्रायने मायस्पीड नावाचे ऍप आणले होते. या ऍपच्या सहाय्याने रिलायन्स जिओचा डाऊनलोड वेग तपासला असता तो ९.९२ एमबीपीएस आहे. याबाबतीत भारती एअरटेल कंपनी दुस-या स्थानी असून तो वेग ८.०७ एमबीपीएस आहे, तर व्होडाफोनचा वेग ७.५३ एमबीपीएस नोंदविण्यात आला. अपलोड करण्यासाठी रिलायन्स जिओचा सरासरी वेग २.६२ एमबीपीएस, व्होडाफोन ४.०९ एमबीपीएस, आयडिया ३.९ एमबीपीएस आणि एअरटेलचा वेग ३.३१ एमबीपीएस आहे.

Leave a Comment