२१ फेब्रुवारीला १० महापालिकेसाठी मतदान


मुंबई : १० महानगरपालिका आणि नागपूर वगळता २५ जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

तर २५ जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. १६ फेब्रुवारीला मतदाना पहिला टप्पा पार पडणार असून यात १५ जिल्ह्यांचा समावेश असेल. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल २३ फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी जाहीर केला.