२० वर्षीय मुलगा देणार बाळाला जन्म; सत्य जाणून तुम्ही व्हाल दंग


या धयकादायक बातमीवर विश्‍वास ठेवणे तसे कठिणच आहे, पण हे सत्य आहे. ब्रिटनमधील एक 20 वर्षीय मुलगा गरोदर आहे. या गरोदर मुलाचे नाव हेडेन क्रॉस असे आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला सोशल मीडियावर एक स्पर्म डोनरने स्मर्प ऑफर केली होती, ज्यामुळे हेडेन गरोदर राहिला.

असे मानले जात आहे की, ब्रिटनमधला तो पहिला व्यक्ती ठरणार आहे, जो की बाळाला जन्म देणार आहे. हेडेनला फेसबुकच्या मदतीने एक स्पर्म डोनर मिळाला. ज्याच्यामुळे तो प्रेग्नेंट राहिला. दरम्यान, हेडेने क्रॉस याचा जन्म एक मुलगी म्हणूनच झाला होता. मात्र लांब हार्मोन ट्रीटमेंटमुळे त्याच्यात बदल होऊन तो मुलगा झाला. मागील तीन वर्षांपासून तो पुरूषांप्रमाणे राहत आहे.

हेडन सुपर मार्केटमध्ये काम करत होता. मात्र, प्रेग्नेंट असल्याने सध्या तो घरीच आराम करत आहे. सध्या हेडेनला चौथा महिना सुरू असून काही महिन्यानंतर तो बाळाला जन्म देणार आहे. हेडेन म्हणाला, मी थोडा चिंतात आहे की मी कसा दिसेल आणि इतर जण माझ्याबाबत काय विचार करतील. काही जण माझी टिंगलही करतील. कारण मी ट्रांस असूनही प्रेग्नेंट आहे. पण मला याचा गर्व आहे की, मी जे करत आहे त्यामुळे काही जण प्रेरित होऊन आपल्या आनंदासाठी असे करतील. आता मला एकटेच राहणे आवडते. कारण माझ्या होणार्‍या बाळाला वेळ आणि त्याची योग्य काळजी घेऊ शकेन. मी स्वत।ला मुलगा समजतो आणि मी एक चांगला वडील बनवून दाखवेन, असे त्याने सांगितले.