सोमवारपासून कार्डने पेमेंट न घेण्याचा पेट्रोल पंपचालकांचा निर्णय


नवी दिल्ली – सोमवारपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डांनी पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंपचालकांनी घेतला असून हे पाऊल कार्डांनी पेमेंट केल्यावर प्रत्येक व्यवहारावर बँकांकडून लावण्यात येणा-या १ टक्का अधिभाराच्या निषेधासाठी उचलले असल्याची माहिती पेट्रोल आणि डिलर असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी दिली आहे.

बन्सल म्हणाले, आमचा नफ्याचा वाटा केएलद्वारे ठरलेला असतो. पण बँक जास्त शुल्क आकारत आहे. मार्जिनचा हिशेब ठेवण्यासाठी आम्ही विशिष्ट तंत्र अवगत केले असल्यामुळे जास्त शुल्क आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या डिलर्सना बँकांच्या या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र दुसरीकडे आयसीआयसीआय बँक कार्डांच्या व्यवहारावर कोणतेही अधिकचे शुल्क आकारणार नसल्याची माहिती बँकेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.