सलमानच्या चेष्टेमुळे ऐश्वर्याला आवरेना हसू


ऐश्वर्या राय आणि सलमानखान कधीही कुठेही एकत्र येणार असतील तर त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही सुरू राहतात. दोघे समोरासमोर आल्यावर कायकाय झाले याची चर्चाही अनेक दिवस मिडीयात होत राहते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभिषेक बच्चन याने सलमानखानची चेष्टा केली व ती पाहून ऐश्वर्याला हसू आवरेना. बराच काळ ती खळखळून हसताना दिसली.

एका अॅवार्ड शेामध्ये अभिषेक व रितेश देखमुख होस्ट होते. काँपेअरींग करताना नोटबंदीवर विषय आला तेव्हा अभिषेकने त्यात बॉलीवूड कलाकारांना गुंफले व ते एटीएमच्या लाईनत उभे राहिले तर काय काय घडेल याची कल्पना केली. यावेळी अभिषेकने सलमानखान लायनीत आला तर मुझपर एक एहसान करो की कोई एहसान मत करना असा डायलॉग फेकला. त्याच्या या जोकवर ऐश्वर्याला हसू आवरेना. तसे अभिषेकने आपल्या पिताश्रींचा हम जहाँ खडे रहते है, लाईन वहाँ से शुरू होती है हा डायलॉगही वापरला व त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.