सचिनच्या हातात तबला आणि झाकीरच्या हातात बॅट?


आपापल्या क्षेत्रात दिग्गज स्थानी पोहोचलेल्या व्यक्ती आपण नुसत्या नजरेसमोर आणल्या तरी त्यांची कांही ठराविक प्रतिमाच आपल्यासमोर येते. म्हणजे सचिन तेंडुलकर म्हटले तर बॅट आठवणार, तसेच उस्ताद झाकीर हुसेन म्हटले की तबलाच आठवणार. समजा या दोघांनी त्यांच्या भूमिका बदलल्या तर? कल्पना करून तर पहा, कारण खुद्द सचिनने तसेच काही फोटो ट्विटवरवर प्रसिद्ध केले आहेत. या संदर्भातला एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

यात सचिन एका संगीत मैफिलीत साथ करताना दिसतो आहे. प्रथमच सचिन हे काम करताना पाहायला मिळतो आहे. झाकीर हुसेन व सचिनची जुगलबंदी लोकांनाही फार आवडलीय. सचिननेच ही माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यात असाही एक फोटो आहे ज्यात सचिनच्या हातात छोटा तबला डग्गा आहे तर उस्तादांच्या हातात आहे छोटी बॅट.