रशियाच्या हाती ट्रम्प यांचा ‘तो’ व्हिडीओ


वाशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तरीही त्यांच्या अडचणी संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. रशियाकडे ट्रम्प यांचा सेक्स व्हिडीओ असल्याची माहिती अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे. तसेच ट्रम्प यांना अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनीही याची कल्पना दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ट्रम्प यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, २०१३ला मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये ट्रम्प यांनी कॉलगर्ल्ससोबत केलेल्या सेक्सचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांना ब्लकमेल करून रशियाने अनेक करार करून घेतल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली असल्याचे वृत्त सीएनएननी दिले आहे.

तत्पूर्वी रशियन हॅकर्सनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना जिंकवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष आणि हिलरी क्लिंटन यांच्या संगणकातील महत्त्वाची माहिती हॅक केल्याचेही समोर आले होते. तसेच ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशियन सरकारच्या प्रतिनिधींमध्येही मोठ्या प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याचे समोर आले आहे.