युतीबाबत सेना-भाजपचे एकमत


मुंबई – युतीबाबत सकारात्मक चर्चा आणि विधाने शिवसेना आणि भाजपच्या नेत्याकडून आली असून मुख्यमंत्री निवासस्थानी आज सकाळी भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेला युतीबाबत निमंत्रण देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हणाले की, मी कधीच युतीबाबत नकारात्मक नव्हतो, जागावाटपाबाबत माझ्याकडे एक नवा फॉर्म्युला आहे. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी ३-३ नेते जागा वाटपाची चर्चा करतील पण अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्रीच घेऊ.

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण जागावाटप झाल्यावरच अंतिम चित्र समोर येईल. युतीच्या जागावाटपासाठी आजपासून चर्चा सुरु करणार असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे.