Skip links

बाजारात येत आहे दोन हजाराच्या नोटेच्या डिझाईनची साडी


सुरत : नोटाबंदीनंतर नव्यानं आलेल्या दोन हजाराच्या नोटेचे डिझाईन असलेली प्रिंटेड साडीही बाजारात उपलब्ध होत असून या साडीच्या उत्पादनाला गुजरातच्या सुरतमधील शंकर भाई सैनी या कापड व्यापाऱ्याने सुरुवात केली आहे. या साडीला देशभरातून मोठी मागणी होत आहे. त्यात या साडीची किंमत फक्त १६०रुपये असणार आहे. आधीच महिलांना गुलाबी रंगाचं कौतुक असते, त्यात या रंगाची दोन हजाराच्या नोटेचे डिझाईन असलेली साडी बाजारात आल्यास त्यांची गर्दी होईल, असा विश्वास व्यापाऱ्याला होता. दोन हजाराच्या ५०४ नोटा एका साडीवर आहेत.

विधानसभेच्या निवडणुका ज्या राज्यात आहेत, त्या राज्यात २ हजाराच्या प्रिंटेड साडीला मोठी मागणी असल्याचे सैनी यांनी म्हटले आहे. सध्या या साडीची विक्री सुरतमध्ये सैनी यांच्या दुकानात होत असून महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.