बंगळुरू प्रकरणावर नाना पाटेकरांनी दिली संतप्त प्रतिक्रिया


प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर आणि प्रसून जोशी यांनी मुंबईतील विविध शाळांमधील मुलांसोबत षण्मुखानंद सभागृहामध्ये संवाद साधला. नाना पाटेकर यांनी यावेळी बंगळुरू घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना जागेवरच धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.

मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे निकाल लवकर लागले, त्यांना शिक्षा झाली तर अशा गोष्टींवर आळा बसण्यास मदत होईल, असे अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. मुलींनी त्यामुळे घाबरून न जाता या घटनांना हिम्मतीने सामोरे जावे लागेल. काही मद्यपी हुल्लडबाजांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीत महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागले आहे. त्यातील पुराव्याच्या अधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ पोलिसांच्या हाताली लागला असून, त्यात भररस्त्यात एका तरूणीचा विनयभंग होत असल्याचे दिसत आहे.