Skip links

नोटबंदीनंतरचे वाईट परिणाम अजून यायचे आहेत – मनमोहन सिंह


नवी दिल्ली – संपूर्ण देशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम झाला. पण त्याचे वाईट परिणाम अजून यायचे आहेत. देशाचे नोटाबंदीमुळे फार मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती बिघडून खराब झाली पण त्यापेक्षा पण अजून वाईट घडायचे आहे अशा शब्दात नोटाबंदीच्या निर्णयावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी टीका केली.

अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा परिणाम होईल हे मी संसदेत बोललोच होतो. काही रेटींग एजन्सींनी विकास दराचा आकडा ६.६ टक्क्यापर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे असे मनमोहन सिंग म्हणाले. नेहमी अर्थव्यवस्था बदलण्याचा दावा पंतप्रधान मोदी करतात पण त्यांचे दावे फसवे आहेत. काँग्रेसच्या जनवेदना मेळाव्यात मनमोहन सिंह बोलत होते.