डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरसाठी दिशाचे ‘टॉपलेस’ फोटोशूट


सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरमध्ये ‘एम.एस. धोनी – द अनडोल्ड स्टोरी’ मध्ये झळकलेली अभिनेत्री दिशा पटानी हॉट अवतारात दिसणार असून तिने डब्बू रतनानीसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसंदर्भात दिशा पटानीने सांगितले की, मी फोटोशूटमध्ये टॉपलेस नसून यात केवळ माझी पाठ पाहायला मिळत आहे. ही कल्पना डब्बू रतनानीची होती. त्याने जसे करायला सांगितले तसे मी केले. तसेच या कॅलेंडरसाठी मी पहिल्यांदा फोटोशूट केले आहे. हा फोटो दिशाने इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.

प्रत्येक वर्षी एक नवीन कॅलेंडर प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी लाँच करतो, ज्यामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सला वेगवेगळ्या अवतारात दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या वर्षीही बॉलिवूडमधील तारे-तारका नव्या अंदाजात-नव्या ढंगात डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरमध्ये पाहायला मिळणार आहेत. लवकरच डब्बू रतनानी आपलं नवे कॅलेंडर लाँच करणार आहे.