गिरीशला लागली बॉलीवूडची लॉटरी


अभिनेता गिरीश कुलकर्णीला आपण आमिर खानच्या दंगल चित्रपटात एका कुस्ती प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिले होते. आता पुन्हा एकदा आणखी एका बॉलिवूड चित्रपटामध्ये गिरीष झळकणार आहे. डीएनए या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेता गिरीश कुलकर्णी हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणाऱ्या आगामी ‘काबिल’ या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता गिरीश कुलकर्णीने ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगचीच दाद दिली होती.

दरम्यान गिरीश कुलकर्णी ‘काबिल’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला की, साचेबद्ध भूमिका करायला मला आवडत नाहीत. त्यामुळे ‘अग्ली’ या चित्रपटात पोलिसाची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारायची नाही असे मी ठरवलेच होते. पण, राकेशजींबद्दल (राकेश रोशन) माझ्या मनात फार आदर असल्यामुळे मी त्यांचा प्रस्ताव नाकारु शकलो नाही, असे डीएनएने प्रसिद्ध केले आहे.