अॅपलच्या स्मार्टवॉचला टक्कर देणार सॅमसंगची गिअर ३ लक्झरी स्मार्टवॉच


नवी दिल्ली – सॅमसंगने अॅपलच्या स्मार्टवॉचला टक्कर देण्यासाठी गॅलक्सी गिअर ३ ही स्मार्टवॉच लाँच केली असून दोन व्हॅरियन्ट्समध्ये ही घड्याळ उपलब्ध होणार आहे. सॅमसंगने फ्रंटियर आणि क्लासिक मॉडल या दोन व्हॅरियंटमध्ये ही घड्याळ लाँच केली आहे. फ्रंटियर हे मॉडल हे नव्या प्रकारची उत्पादने वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आहे तर क्लासिक मॉडेल हे खऱ्या अर्थाने लक्झरी वॉच या प्रकारात मोडणारे घड्याळ आहे. फ्रंटियर मॉडलचा लूक स्पोर्ट्स वॉच सारखा आहे तर क्लासिक मॉडल हे बिजनेस किंवा ऑफिस मॉडल आहे.

२८,५०० रुपये ऐवढी या दोन्ही घड्याळांची किंमत आहे. १८ जानेवारीपर्यंत ही दोन्ही घड्याळे सॅमसंगच्या शोरुममध्ये उपलब्ध होणार आहेत. या स्मार्टवॉचचा उपयोग केवळ वेळ पाहण्याकरिता नसून याद्वारे आपण मोबाइलवर करता येईल ती सर्व कामे करू शकतो. या घड्याळाच्या साहाय्याने आपण कॉल उचलू किंवा टाळू शकता. ही घड्याळे टचस्क्रीनवर चालतात. तुमच्या फोनवर आलेले मेसेज देखील तुम्ही वाचू शकतात.