अक्षयच्या ‘जॉली एलएलबी २’ मधील नवे गाणे


अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. अक्षयनेच ‘बावरा मन’ या गाण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या गाण्यात हुमा आणि अक्षय यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

हे गाणे जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांनी गायले आहे तर सोशल मीडियावर #BawaraMann हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. चित्रपटात अक्षय जॉली या वकिलाच्या भूमिकेत आहे. कॉमेडी, अॅक्शन आणि इमोशन यांचा संगम ‘जॉली एलएलबी २’मध्ये पाहायला मिळेल. ‘जॉली एलएलबी’ या २०१३ मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून सुभाष कपूर यांनी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.